शितल इंदापूरकर यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले

Beed

शितल इंदापूरकर यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले

बीड प्रतिनिधी

सांस्कृतिक सभागृह, शहर पोलीस स्टेशन समोर, उस्मानाबाद येथे समर्पण व उद्देशीय सामाजिक संस्था, सांजा रोड उस्मानाबाद च्या वतीने आयोजित मकर संक्रांति स्पेशल 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 प्रदर्शनी स्टॉल स्पर्धा कार्यक्रम मध्ये शितल हेमंत इंदापूरकर यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक चे पारितोषिक मिळवले. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. या विषयी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी त्या स्टॉलमध्ये स्वतःच्या माय लाईफ ओके कंपनी अंतर्गत तयार होणारे सर्व खाद्यपदार्थ चा मोठा स्टॉल लावला होता. त्या पाच दिवसांमध्ये सर्वात जास्त त्यांच्या स्टॉल मधील खाद्य पदार्थ ची विक्री झाली होती. त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला .यावेळी संस्थेच्या सचिव एडवोकेट कल्पना निपाणीकर ,शिवश्री संजय लगड पाटील(शिवचरित्र व्याख्याते), विजय दादा पोकळे( सीएमडी ,महिला विकास संघ ),भागवत वैद्य( पत्रकार तथा प्रोजेक्ट डायरेक्टर महिला विकास संघ) त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्पर्धकासह आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter