"अॅन्टी करप्शन मधील आरोपी वनपाल सातपुते यांना मा.जिल्हा न्यायालयाकडुन अटकपुर्व जामीन मंजुर "- अॅड. अविनाश पं. गंडले

Beed

"अॅन्टी करप्शन मधील आरोपी वनपाल सातपुते यांना मा.जिल्हा न्यायालयाकडुन अटकपुर्व जामीन मंजुर "- अॅड. अविनाश पं. गंडले

बीड/वार्ताहर

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी बीड येथील सॉ. मिलचे अध्यक्ष शेख खरिर बाबा मिया यांना सॉ मिलचे लायसनचे नुतनिकरणास वन रक्षक संतोष जाधव, वाहन चालक बिभीषण भालेराव व वनपाल शेषेराव सातपुते यांनी रक्कम रुपये 50,000/- ची लाच मागीतली होती, त्यामुळे फिर्यादी शेख खदीर याने औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय येथे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेवुन दिनांक. 28/12/ 2022 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय, जालना यांनी सापळा रचुन सापळा पथक पंच व तक्रारदार हे लाचेच्या सापळ्यासाठी लागणारी रक्कम रुपये 50,000/- ला अॅथ्रासिन पावडर लावुन फिर्यादी यांच्या पठाणी शर्ट च्या शिख्यात ठेवले व आरोपींना रक्कम रुपये 50,000/- ची लाच घेताना पकडले. त्यामुळे आरोपी विरोधात पोलीस स्टेशन पेठ, बीड येथे गु.र.नं. 227/ 2022 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी सातपुते यांनी बीड जिल्ह्यातील फौजदारी चे विधीज्ञ अॅड. अविनाश पं. गंडले यांचे मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज क्र. 07/2023 नुसार अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. आरोपी तर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, बीड यांनी आरोपीस दिनांक. 13/01/2023 रोजी अटकपूर्व जामीन मंजुर केला. सदर जामीन अर्ज हा अटकपूर्व दाखल केला असल्यामुळे जामीन अर्जाकडे संपुर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले होते.

आरोपीतर्फे फौजदारी क्षेत्रातील जेष्ट विधीज्ञ अॅड. अविनाश पं. गंडले यांनी काम पाहीले त्यांना अॅड. ईमरान पटेल, अॅड. बप्पा माने, अॅड. सुरक्षा जावळे, अॅड. किरण मस्के, अॅड. राजेश बनसोडे, अॅड. गोवर्धन पायाळ, अॅड. शुभम सरवदे, अॅड. राजेश शिंदे, अॅड. वैभव धन्वे, अॅड. वसीम शेख यांनी सहकार्य केले.

Sharing

Visitor Counter