बीड शहरातील हिनानगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित करताच आज पुर्ण भागात सॅनिटायजर फवारनी
Beed

बीड शहरातील हिनानगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित करताच आज पुर्ण भागात सॅनिटायजर फवारनी
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील हिना नगर येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील हिना नगर येथील गुलाब मुब्बाशीर अहमद यांच्या घरापासून ते हीना पेट्रोल पंप पर्यंत या परिसरात पुर्णपणे सॅनिटायजर फवारनी करण्यात आली आहे.
पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ हा परिसर बंद करण्यात येवून या ठीकाणी संचार बंदी लागू करण्यात आली आहे असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
