नवीन वर्ष सुरू होतेच बीड शहरात व मतदार संघातील विकास कामाचा ओघ-आ संदीप क्षीरसागर

नवीन वर्ष सुरू होतेच बीड शहरात व मतदार संघातील विकास कामाचा ओघ-आ संदीप क्षीरसागर
विविध मागण्यांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सकारात्मक
मुंबई/प्रतिनिधी
बीड विधानसभा मतदारसंघ 2022-23 या आर्थिक वर्षातील विविध विकासकामांवरील स्थगिती उठविण्यात यावी या मागणीसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेबांची आ संदीप क्षीरसागरांने भेट घेऊन व सविस्तर चर्चा करून निवेदन दिले यावर मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविली असून नवीन वर्षाच्या सुरुवातीसच बीड शहरात आणि मतदारसंघात विकास कामाचा ओघ सुरू होणार.
बीड तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी मोठा निधी आपले सरकार असताना आपण मंजूर केला होता. यामध्ये शहरातील संस्कार विद्यालया जवळील भाजी मंडई आणि बिंदूसरा पात्रातील भाजी मंडी परिसराच्या नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता आणि बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उंची वाढविणे आणि परिसराची सुशोभीकरणाची मागणी माझ्यासह शहरातील नागरिकांना कडून वारंवार होत असून याबाबतीत मी अनेक वेळा जिल्हा नियोजन बैठकीत प्रस्ताव दाखल केला आहे तो पण प्रलंबित असून याबाबतही निर्णय घेण्यात यावा. सत्तांतरामुळे मंजूर झालेल्या दोन्ही भाजी मंडी च्या विकास कामावर देखील सध्या स्थगिती आहे. आता आपण याबाबत लवकरत लवकर निर्णय घेऊन बीड मतदार संघातील विकास कामांना पूर्ववत करावे या व विविध मागण्या निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाशी सविस्तर चर्चा करून मागणी केली यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतील असुन बीड शहरात आणि मतदार संघात विकास कामाचा ओघ सुरू होणार असून हिच नवीन वर्षाची मतदारांनी भेट असेल.
