जागतिक अबॅकस प्रवेश परीक्षामध्ये कनिष्का विनोद किर्दकला सर्वोत्कृष्ट सुवर्ण ट्रॉफी आणि वुडन साईटेशन

Beed

जागतिक अबॅकस प्रवेश परीक्षामध्ये कनिष्का विनोद किर्दकला सर्वोत्कृष्ट सुवर्ण ट्रॉफी आणि वुडन साईटेशन

जागतिक अबॅकस चॅम्पियनशिपसाठी कनिष्काची निवड

बीड/प्रतिनिधी

बौद्धिक आणि सर्वांगीण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. बीड मधील अबॅकस व वैदिक स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि वैदिक चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन अबॅकस चौथ्या लेवलपरीक्षांमध्ये ज्युनियर ग्रुपमध्ये कनिष्का विनोद किर्दकला जागतिक अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. बीडच्या अबॅकस सेंटर मध्ये दहा नोव्हेंबर 2022 रोजी निकाल जाहीर झाल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट गोल्डन ट्रॉफी आणि वुडनसाइटेशन मिळवून कनिष्का किर्दकने सर्वोत्‍कृष्‍ट मेडलिस्ट रँकर चॅम्पियनशिपमध्ये सहभाग मिळवला आहे. जागतिक अबॅकस स्पर्धा जानेवारी 2023 मध्ये होत असून त्यामध्ये भारतासह मोरोक्को, नेपाळ, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, यु एस ए , सिंगापूर, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, देशांमधील पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यी सहभाग घेणार आहेत. कनिष्का किर्दकच्या यशामध्ये अबॅकस शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कनिष्का किर्दकची गणित विषयाबद्दलची मनात असणारी आणखी आवड निर्माण होऊन अनेक गणिते सहज आणि सोप्या पद्धतीने वेळेच्या आत मध्ये सोडवले जात आहेत असे तिने सांगितले आहे. ओसाका अबॅकस असोसिएशन चेअरमन, आय सी एम एस मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रसाद अग्रवाल तामिळनाडू तसेच अरिस्तो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा ओरिसा आणि , जी एस ए अबॅकस असोसिएशनचे श्रीनिवासन कुमारण दिल्ली, अबॅकस स्टडी सेंटरचे आयोजक डॉ. ए एस घोडके कनिष्का किर्दकने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून कनिष्काचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व त्याचे आई,वडील , लहान भाऊ कौशल आणि कौशिक, मित्र, प्रा.शशिकांत जावळे , प्रा. नारायण घोलप , प्रा.अनिल जरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.

सर्वांगीन विकास करण्यासाठी भारतीय वैदिक तसेच अबॅकस गणित पध्दत फार उपयोगी आहे असे अबॅकस आणि वैदिक मॅथ मास्टर ट्रेनर एस. ए. घोडके यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter