आयसीए’च्या अध्यक्षपदी डॉ.वाल्मिक सरवदेयांची वर्णी लागणार

’आयसीए’च्या अध्यक्षपदी डॉ.वाल्मिक सरवदेयांची वर्णी लागणार
बीड जिल्हयातील भुमीपुत्राला राष्ट्रीय स्तरावर सन्मान
बीड/वार्ताहर
दि.२६ : ’इंडियन कॉमर्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी डॉ.वाल्मिक सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता असलेले डॉ.वाल्मिक सरवदे हे सावळेश्वर-पैठण (ता.केज) येथील रहिवाशी असून त्यांच्या रुपाने बीड जिल्हयात राष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला आहे.. दहा वर्षानंतर महाराष्ट्राला ’आयसीए’च्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. डॉ.सरवदे यांचे महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात झाले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ वी अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे यजमानपद मिळाले. या परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ.वाल्मिक सरवदे यांची सर्वानुमते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. डॉ.सरवदे हे वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असून नुकतीच त्यांची व्यवस्थापन परिषदेवर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीस मावळत्या अध्यक्षा डॉ.सस्मिता सामंथा, सचिव डॉ.पुष्पेंद्र मिश्रा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल डॉ.वाल्मिक सरवदे यांचे मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, डॉ.सय्यद अझरुद्दीन यांनी अभिनंदन केले आहे.
बीड जिल्हयात पहिल्यांदाच बहुमान
’इंडियन कॉमर्स असोसिएशन’ या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्रातील सर्वात मोठया संख्येच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या रुपाने पहिल्यांदाच मराठवाडयाला मिळाला. यापुर्वी डॉ.शिवशंकर मिश्रा यांना अध्यक्षपद मिळाले ते मुळ विदर्भाचे होते. आजपर्यंत डॉ.एम.एस.गोसावी (नाशिक), प्रा.ए.डी.शिंदे (कोल्हापूर), डॉ.एस.एस.मिश्रा (औरंगाबाद), प्रा.एस.जी.देशपांडे (जळगांव), डॉ.बबनराव तायवडे (नागपूर) व प्राचार्य टी.ए.शिवारे या महाराष्ट्रातील प्राध्यापकांना ’आयसीए’च्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली.
