नवनिर्वाचित सरपंचसह ९ जनावर गुन्हा दाखल

Beed

नवनिर्वाचित सरपंचसह ९ जनावर गुन्हा दाखल

बीड/प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण करत आणि घोषणा देत आलेल्या शाहेद पटेलसह इतरांनी घरासमोर येवुन जातीवाचक घोषणाबाजी करत दगडफेक केल्याचा प्रकार काल सायंकाळी नांदूर हवेली (ता. बीड) येथे घडला. यावेळी पटेल व इतरांनी वाईट उद्देशाने हात पकडल्याची तक्रार महिलेने दिली असून या प्रकरणी शाहेद पटेलसह नऊ व इतरांविरूध्द विनयभंग, अॅट्रॉसिटी कलमांतर्गत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड तालुक्यातील नांदुर हवेली येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल सायंकाळी ७ वाजन्याच्या सुमारास गावातील शेख शाहेद शेख मुजफ्फर शेख आमेर अहेमद शेख शेख अन्सार, शेख रियाज शेख रज्जाक, शेख राज् शेख बाबु, शेख शाकेर शेख इसाक, गणेश बुधनर, सिराज शेख रज्जाक, पठाण रियाज अय्युब व इतरांनी आमच्या घरासमोर येवुन गुलाल उधळत जातीवाचक घोषणा दिल्या. शेख शाहेद व इतरांनी माझ्याजवळ येवुन वाईट उद्देशाने अंगावर गुलाल टाकुन हात पकडला. त्यानंतर दारात उभ्या असलेल्या स्कॉर्पिओसह वाहनांची तोडफोड केली. गाडीवर चढून शेख शाकेर, गणेश बुधनर यांनी चार चाकी गाडीच्या काचा फोडल्या व शेख मतीन शेख निसार, पठाण रिझवान अय्युब शेख मतीन शेख निसार, शेख सिराज शेख रज्जाक, शेख शकील प शेख मुनीर व प्रदुम्यन शिवनारायण बुधनर यांनी आमच्या घराच्या खिडक्यांवर, व पत्र्यांवर दगडफेक करून काठ्यांनी व दांड्यांनी दारावर मारले अशी तक्रार महिलेने दिली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शाहेद पटेलसह इतरांविरुध्द अ कलम ३५४, १४३, १४७, १४९, ३३६, ३३७, ४२७, ५०४, अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास डीवायएसपी संतोष वाळके करत आहेत.

Sharing

Visitor Counter