दिल्लीच्या कॅरीटास संस्थेचा मानाचा पुरस्कार समीर काझी यांना प्रधान

Beed

दिल्लीच्या कॅरीटास संस्थेचा मानाचा पुरस्कार समीर काझी यांना प्रधान

बीड/प्रतिनिधी

दिल्ली येथील कॅरिटाचा संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पत्रकारितक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे बीड येथील दैनिक प्रसाराचे संपादक समीर काझी यांना दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला देश पातळीवरील मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल समीर काझी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

कॅरीटास ही दिल्ली येथील संस्था गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याबरोबरच समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना पाठबळ देण्याचे काम या संस्थेकडून केले जात आहे प्रत्येक वर्षी देश पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना अधिक काम करण्यासाठी पाठबळ देण्याचे काम या संस्थेकडून केले जाते 2022 या वर्षांमध्ये ओलोनेशिया 2022 या पुरस्काराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते ग्रामीण भागात शहरी भागात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कामाची दखल घेऊन संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले होते 18 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथील एका मोठ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले बीड येथील दैनिक प्रसाराचे संपादक समीर काझी यांची निवड करण्यात आली होती पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात केलेले कामाची दखल घेऊन मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला देशभरातील 11 जणांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यात महाराष्ट्रातून केवळ दोन जणांची निवड करण्यात आली त्यातील समीर काझी हे बीड जिल्ह्यातून पत्रकारितक्षेत्रात काम करणारे तर दुसरा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरपंच म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला सरपंचाला देण्यात आला नवी दिल्ली येथील नामांकित संस्थेचा आणि मानाचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार समीर काजी यांना मिळाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

 

समीर काझी यांनी मानले सेन्ट अन्स सोशल सेंटरचे मानले आभार

कॅरिटास इंडिया या संस्थेकडून वोलोनेशिया 2022 हे पुरस्कार मला सेंटेंस सोशल सेंटरच्या संचालिका अॅड. अँनी जोसेफ यांच्या सहकार्यामुळे मिळाल्याने त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो.

 

Sharing

Visitor Counter