मुलं संस्कारीत होऊन सुजाण नागरिक बनणे ही पालकांची व समाजाची जबाबदारी-प्रा. डॉ. नामदेव शिनगारे

मुलं संस्कारीत होऊन सुजाण नागरिक बनणे ही पालकांची व समाजाची जबाबदारी-प्रा. डॉ. नामदेव शिनगारे
इंदिरानगर परिसरात विद्यार्थ्यांना वही पेन वाटप
बीड/प्रतिनिधी
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या, दीनदुबळ्यांच्या शिक्षणाकरिता बहुमोल कार्य केले त्यांच्या महान कार्यास कुणीही विसरू शकत नाही. सध्या परिस्थितीत खाऊजी धोरणामुळे दीनदुबळ्या बहुजनांची मुला मुलींना उच्चदर्जाचे शिक्षण मिळविण्याकरिता अनंत अडचणी येत आहेत, तरीही त्या परिस्थितीत मुलं संस्कारित होऊन सुजाण नागरिक बनणे ही पालकांची व समाजाची जबाबदारी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करून दानदात्यांकडून मिळालेल्या वही पेन वाटपाच्या तिसऱ्या टप्प्यातील इंदिरानगर परिसरात येथे एकूण 71 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. नामदेवराव सिनगारे यांनी उद्गार काढले.
महामानव अभिवादन ग्रुप, सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ बीड,वाचाल तर वाचाल फिरते वाचनालय यांनी इंदिरानगर कॅनॉल रोड परिसरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दलाचे मेजर तथा कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नामदेव शिनगारे प्रा. डॉ. संजय सावते व विभागीय अध्यक्ष जी.एम. भोले, अरविंद डोळस,विचार मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्यमाला अर्पण करण्यात आली व उपस्थितांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक डी. जी. वानखेडे यांनी केले. विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधताना प्रा.डॉ.शिनगारे म्हणाले की तथागताच्या उपदेशाप्रमाणे "माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे". क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान प्रयत्नामुळे आजच्या शिक्षित व प्रगतीच्या मार्गावर असलेल्यांनी, माता रमाईचा त्याग-स्मरून मागे पडलेल्य समाजाकरता आपल्या कमाईतून 20 वा भाग खर्च करणे हा डॉ. बाबासाहेबांचा बहुमोल उपदेश अमलात आणून दान पारमितीचे पालन करून अल्पशा प्रमाणात का होईना सहभाग नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे,असे स्पष्ट करून अशा समाज उपयोगी कार्यास सतत सहभाग नोंदवण्याचे त्यांनी ठोक आश्वासन देऊन उपस्थितना देखील आवाहन केले.प्रा.डॉ. सावते यांनी देखील मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना ज्ञान प्राप्ती करता मोलाचा उपदेश केला,कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी अत्यंत कळकळीने विद्यार्थ्यांना उपदेश केला की बालवयात केवळ आणि केवळ ज्ञान प्राप्त करणे व गुरुजनांचे व पालकांच्या आज्ञा पालन करणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन काशिनाथ वाघमारे यांनी व्यक्त केली.सुमित्रा ससाने,कौशल्या घाडगे,जयश्री साळवे,छबुबाई साबळे,रूपाली खरात,बेबी साळवे,गौतम जावळे, गणेश शिंदे,विश्वनाथ साळवे, बबलू साळवे,अशोक हरिभाऊ, बाळासाहेब सरवदे परिसरातील जेष्ठ नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक साळवे, कुणाल वारभुवन,जयश्री यांनी बहुमोल परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सरणातयेणे करण्यात आली.
