महापुरुषाबद्दल यापुढे बेताल वक्तव्य कराल तर याद राखा महाराष्ट्रातील

Beed

महापुरुषाबद्दल यापुढे बेताल वक्तव्य कराल तर याद राखा महाराष्ट्रातील

जनता तुम्हाला माफ करणार नाही -आ.संदीप भैय्या क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी

गेल्या कित्येक महिन्यांपासून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल उच्च पदावर असणारे राज्यपाल,मंत्री,प्रवक्ते,आमदार बेताल वक्तव्य करून या महापुरुषांची बदनामी करीत आहेत. जाणून बुजून केलेले अशा गोष्टी महाराष्ट्रातील जनता कधीच खपवून घेणार नसून यापुढे जर असे बेताल वक्तव्य कराल तर याद राखा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही असे वक्तव्य बीड येथे सर्व महापुरुष प्रेमी संघटना विविध राजकीय पक्ष यांच्यावतीने राज्यपाल हटाव या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंद प्रसंगी बीड मतदार संघाचे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की,गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात महाराष्ट्राचे आराध्यदैवत तसेच महापुरुषांबद्दल त्यांच्या इतिहासाची माहिती न घेता वाचन न करता काही पण बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना भडकविण्याचे काम राज्यपाल भगतसिंग कोशयारी केंद्रीय भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, महाराष्ट्रातील मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, आ.मंगल प्रभात लोढा, संतोष दानवे, प्रसाद लाड यांनी सातत्याने आणि जाणीवपूर्वक केले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. हा बंद लोकशाही मार्गाने असून वरील विघ्न संतोषी मंडळींचा भाजप आणि केंद्र सरकारने राजीनामा घेऊन महाराष्ट्रात वाढत चाललेला रोष थांबवा अन्यथा येणार्‍या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यासाठी महापुरुषांचा सन्मान करणारे विविध संघटना राजकीय पक्ष आणि सामान्य जनता सज्ज झाली आहे. बीड शहरातील महापुरुषांचा सन्मान करणार्‍या सर्व व्यापारी, बंधू आणि सामान्य नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत सामान्य जनतेच्या भावना पोचवाव्यात अन्यथा सामान्य जनता या बेताल वक्तव्य करणारे मंडळींना जनता आणि लोक प्रतिनिधी कदापि माफ करणार नाहीत. बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल विविध संघटनेचे राजकीय पक्षाचे तसेच शहरातील व्यापारी बांधवांचे शतशः आभार मानतो.

Sharing

Visitor Counter