दिल्ली येथे होणाऱ्या उर्दू (रिख़्ता) उत्सवात भाग घेण्यासाठी हसीन अख़्तर रवाना

दिल्ली येथे होणाऱ्या उर्दू (रिख़्ता) उत्सवात भाग घेण्यासाठी हसीन अख़्तर रवाना
हिंदी चित्रपट सृष्टीतील जावेद अख्तर, हरिहरन, शबाना आजमी यांची प्रमुख उपस्थिती राहणार
बीड/प्रतिनिधी
देशाची राजधानी दिल्ली येथे दोन वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या उर्दू (रिख्ता) उत्सवात भाग घेण्यासाठी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, उर्दू कवी तथा शायर सय्यद हसीन अख्तर रवाना झाले असून या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम कथा-पटकथा लेखक, गीतकार, शायर जावेद अख्तर, सुप्रसिद्ध गायक हरिहरन आणि अभिनेत्री शबाना आजमी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कोरोना काळामुळे सण २०२० व २१ या दोन वर्षी उर्दू उत्सवाचे आयोजन करण्यास खंड पडला होता. परंतु आता कोरोना मुक्त वातावरण झाल्यामुळे रिख्ता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संजू श्राफ यांनी यावर्षी सातव्या उर्दू उत्सवाचे आयोजन देशाची राजधानी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, इंडिया गेट, नवी दिल्ली येथे केले असून यामध्ये देशपातळीवरील उर्दूमध्ये कार्यरत असलेले एकापेक्षा एक असे नामवंत व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहेत. या उर्दू उत्सवात बीड शहरातून सय्यद हसीन अख्तर यांची निवड झाली आहे. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बोलविण्यात आले आहे. या उत्सवात हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम कथा-पटकथा लेखक व गीतकार जावेद अख्तर, सुप्रसिद्ध गायक हरिहरन, अभिनेत्री शबाना आजमी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात हसीन अख्तर यांना बोलावण्यात आल्यामुळे बीड शहराच्या मनात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी हसीन अख्तर हे दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्लीसाठी रवाना झाले असून तिथे २, ३ आणि ४ डिसेंबर असे तीन दिवसीय उर्दू उत्सव राहणार आहे. ४ डिसेंबर रोजी रिचा शर्मा यांच्या सुफी संगीताने कार्यक्रमाचे समापन होणार आहे. या उत्सवासाठी हसीन अख्तर यांची निवड झाल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छा दिल्या जात आहे.
