वयोवृद्ध चुलता-चुलतीचा पुतण्याकडून कोयत्याने वार चुलता ठार चुलती गंभीर 

Beed

वयोवृद्ध चुलता-चुलतीचा पुतण्याकडून कोयत्याने वार चुलता ठार चुलती गंभीर 

घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल

बीड/वार्ताहर 

आज दि.२५ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ७ वाजता मौजे. मुळुकवाडी ता.जि.बीड येथील वयोवृद्ध चुलता,चुलती बळीराम मसाजी निर्मळ वय ८० वर्षे, केसरबाई बळिराम निर्मळ वय ७० वर्षे यांच्यावर पुतण्या रोहीदास विठ्ठल निर्मळ वय ५० वर्षे याने जमिनीच्या वादातून कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. दोघांना ग्रामस्थांनी रूग्णवाहिकेतुन जिल्हारूग्णालयात पाठवण्यात आले. बळीराम मसाजी निर्मळ यांना मयत घोषित करण्यात आले तर केशरबाई निर्मळ यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

नेकनुर पोलीस स्टेशन एपीआय शेख मुस्तफा ,पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव,पीएसआय पानपाटील लिंबागणेश पोलीस चौकीचे पोहे. डीडुळ,पोना. मुरूमकर घटनास्थळी दाखल असुन स्थळ पंचनामा करण्यात आला असून फोरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Sharing

Visitor Counter