अंमळनेर गटातील आमदार सुरेश धस यांचा कोहीनुर हीरा माऊली जरांगे

अंमळनेर गटातील आमदार सुरेश धस यांचा कोहीनुर हीरा माऊली जरांगे
पाटोदा/वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जिल्हा परिषद गटातील सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडलेला व सतत सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी असलेले जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे हे अंमळनेर गटातील आमदार सुरेश आण्णा धस यांचे कोहीनुर हीरा असल्याचे या गटातील सामान्य नागरिक म्हणत आहेत.
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर गटातील जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे हे गेले अनेक वर्षे आमदार सुरेश आण्णा धस यांचे एक निष्ठेने काम करत असुन त्यांचा तालुक्यातील अनेक गावांत जनसंपर्क असुन ते सतत सामान्य नागरिक व जनतेच्या कल्याणासाठी, कामासाठी शासन दरबारी झटत असतात व लोकांची कामे करत असतात नुसती गुत्तेदारी करुन निकृष्ट दर्जाचे कामे करुन आमदार धस यांचे ते मतदान कमी करत नाहीत, आमदार धस यांचे मतदान कसे वाढेल या साठी ते लोकांच्या जनसंपर्कात राहुन सामान्य नागरिक व जनता,शेतकरी यांचे प्रश्न सतत आमदार सुरेश धस यांच्या कडे मांडुन त्यांची कामे मार्गी लावतात तसेच अधिकारी व कर्मचारी यांना कधीच अर्वाच्य भाषेत न बोलता मवाळ भाषेत बोलुन विकास काम करुन घेतात.
