राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धारूरच्या वतीने वर्धापन दिना निमित्त रक्तदान शिबीर

Beed

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धारूरच्या वतीने वर्धापन दिना निमित्त रक्तदान शिबीर  

किल्ले धारूर/इरफान शेख

 धारूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २२ व्या वर्धापन दिना निमित ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एकूण 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले.                   कोरोना या विषाणू  ने जगात थैमान घातले आहे देशात आज कोरोना मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिन सामाजिक कार्य करून रक्तदान शिबिर घेवून साजरी करण्यात येत आहे  धारूर येथे ग्रामीण रुग्णालयात  माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यांनी स्वतः शिबिरास भेट देवून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. 
     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष माधव निर्मळ, सदस्य सय्यद शाकेर, तालुका अध्यक्ष प्रा ईश्वर मुंडे, सभापती हनुमंत नागरगोजे, युवक तालुका अध्यक्ष सटवा आंडील, युवक शहरआध्यक्ष नितीन शिनगारे, नगरसेवक राजू कोमटवार, मुजाहेद मोमीन, माजी नगरसेवक दत्तात्रय गोन्ने, राम शेळके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Sharing

Visitor Counter