मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड.यांच्या तर्फे "कोविड-योद्धा"सन्मान पत्र जिव्हाळा बेघर निवाराकेन्द्रातील व्यवस्थापक, काळजीवाहक याना देण्यात आले.

मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड.यांच्या तर्फे "कोविड-योद्धा"सन्मान पत्र जिव्हाळा बेघर निवाराकेन्द्रातील व्यवस्थापक, काळजीवाहक याना देण्यात आले.
बीड/प्रतिनिधी
"जिव्हाळा"शहरी बेघर निवाराकेन्द्र,बीड येथे मागील दोन वर्षापासून अनाथ ,बेघर ,निराधार ,ज्यांना कोनीही नाही अशा व्यक्ती ना अन्न ,वस्त्र , मायेचा निवारा दिला जातो.
कोविड -१९ या आपत्ती मध्ये जिवाची पर्वा न करता बेघरांसोबतच शासनाने विलगीकरण केलेले तसेच मुंबई, पुणे आणि ईतर जिल्ह्यातील मजूर, कामगार जे आपल्या गावी पायी जात असलेले यांची अन्न, वस्त्र, निवारा देऊन जे कार्य केले त्या बद्दल "मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था"यांच्या मार्फत बेघर निवाराकेन्द्राचे व्यवस्थापक श्री राजु पुंडलिकराव वंजारे ,स्वंस्थेचे श्री अभिजित मधुकरराव वैद्य, काळजीवाहक,शालीनी कुंदनसिंग परदेशी, रमेश नानाभाऊ वीर, यश राजु वंजारे यांचा जिवाची पर्वा न करता बेघर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना "कोविड-यौद्धा" म्हणून गौरविण्यात आले. या प्रसंगी मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी स्वंस्थेचे अध्यक्ष श्री अँड. सय्यद अजीम,सचिव श्री सय्यद मिनहाजोद्दीन,सहसचिव श्री मिर्झा मोईज बेग,कोषाध्यक्ष श्री शेख कासीम यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
