समाजाला मान्यवर कांशीराम यांचे समर्पण व त्याग विसरु देणार नाही- अॅड.अमोल डोंगरे

समाजाला मान्यवर कांशीराम यांचे समर्पण व त्याग विसरु देणार नाही- अॅड.अमोल डोंगरे
माजलगाव/वार्ताहर
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर साहेब कांशीराम यांचा १५ वा स्मृतिदिन दि.०९ आँक्टोबर २०२२ रोजी माजलगाव विधानसभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला.
फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे समता मुलक सरकार या देशांमध्ये स्थापन व्हावे यासाठी आपले जीवन बहुजन समाजासाठी समर्पित करणारे मान्यवर साहेब कांशीराम साहेब यांनी देशातील तळागाळातील समाजाचे दुखणे आपले समजून या समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरतपणे कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर आणि जम्मू काश्मीर ते महाराष्ट्र असा साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर करून जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोणे - कोणे में असा संदेश घराघरांमध्ये देऊन समाजाला जागृत केले. त्या मान्यवर कांशीराम साहेबांचा त्याग व समर्पण समाजाला विसरु देणार नाही असे अभिवादन सभेत बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे यांनी म्हटले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजलगाव विधानसभा अध्यक्ष अरविंद लोंढे हे होते.तर कार्यक्रमास विधानसभा सचिव राजकुमार मोरे,चंदनलाल बनगे, हरिभाऊ साळवे, सत्यपाल डोंगरे, शाहीर भाग्यवंत,भारत डोंगरे,रविंद्र डोंगरे सह अभिजीत डोंगरे,अनिल जाधव,आदेश डोंगरे,लहु सारंगे,सुमेध जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
