बीड शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकाची जुगार अड्ड्यावर कारवाई!
Beed

बीड शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी.पथकाची जुगार अड्ड्यावर कारवाई!
बीड/प्रतिनिधी
बीड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळे गल्ली कोरडे गणपतीच्या बाजूला डी.बी.पथकाने आज दबंग कारवाई करून जुगार अड्ड्यावर धाड टाकली तर ६ आरोपी सह ९०३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव , पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे , डी बी पथकातील महेश जोगदंड, असलम पठाण, सुदर्शन सारनिकर , गुंजाळ, शिवाजी सानप, चालक सय्यद इम्रान यांनी केली.
