ग्राहकाच्या प्रतिक्षेत बाजार पेठेत सुकसुकाट

ग्राहकाच्या प्रतिक्षेत बाजार पेठेत सुकसुकाट
प्रतिनिधी/सी.एल.झोडपे
(रांजणगाव शे.पु)
जागतिक महामारी कोरोना व्हायरस लाँकडाऊनच्या काळात राज्यातील कामगारासह आंतरराज्यीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात कुटुंबासह स्थलांतर केले.
त्यामुळे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कामगार स्थलांतरमुळे गावातील रुमखोल्या रिकाम्या राहिल्या असल्याने रुममालक हि अडचणीत सापडले आहेत.
लाँकडाऊन चा पाचवा टप्पा महाराष्ट्र सरकारने जाहिर करत असतांना जीवनआवश्यक वस्तु व इतर किरकोळ बाजार पेठ सुरु करण्यासाठी कोरोनाच्या नियमानुसार सुट देण्यात आली पण गावात लोकसंख्याच कमी झाल्याने मुख्य बाजार पेठेत कुणी फिरकत नाही.
दुकानदार आपली दुकाने उघडून बसत आहेत ग्राहकांच्या प्रतिक्षेत पण ग्राहकच नाहीत . कोरोनाचा प्रभाव बाजार पेठेवर पडला असल्याचे दुकानदारांशी संवाद साधला असतांना दुकानदारांनी प्रतिक्रिया दिली.
