कझाकीस्थान मध्ये झालेल्या आयरॉनमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी होवुन

Beed

कझाकीस्थान मध्ये झालेल्या आयरॉनमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी होवुन

बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र प्रसाद पाटील यांनी पटाकावला आयरॉनमॅन किताब

बीड/प्रतिनिधी

नूर-सुलतान (कझाकीस्थान)येथे रविवार १४ ॲागस्ट २०२२ रोजी झालेल्या आयरॉनमॅन ट्रायथलॉन मध्ये बीड जिल्ह्यातील पारगाव घुमरा येथील भुमिपुत्र प्रसाद पाटील यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करत १३ तास १५ मिनिटात पूर्ण केले. आयरॉनमॅन किताब पटकावला आहे.

क्रिडा विश्वासत आंतराष्ट्रीय स्तरावर आयर्नमॅन स्पर्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागते.या स्पर्धेत सल ३.८ किलो मिटर खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी २००० इतर स्पर्धकांसोबत पोहावे लागते. त्यांनतर लगेच १८० किलो मिटर प्रचंड वेगाने वाहणा-या वा-या विरुद्ध सायकलिंग करावी लागते. त्याच बरोबर ४२.२ किलो मिटर धावावे लागते. आव्हान १६ तासाच्या आत पूर्ण करणाऱ्यास आयरॉनमॅन हा किताब बहाल केला जातो. बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र प्रसाद पाटील यांनी भारताचे प्रतिनीधत्व करत १३ तास १५ मिनिटात हे अंतर पूर्ण केले आहे. या स्पर्धेसाठी Powerpeaks academy मध्ये कोच असलेले चैतन्य वेलहाळ यांचे मार्गदर्शन पाटील यांच्यासह ओमकार जोकार, स्वप्निल चिंचवडे, अश्वीन भूते यांचे मागदर्शन त्यांना मिळाले. या यशाबद्दल प्रसाद पाटील यांचा पुण्यात सचिन साठे ,भुलेश्वर नांदगुडे अनिल संचेती, आनंद कुंभार, काळुशेट नांदगुडे, विराज साठे, दाते साहेब, अश्वीन भुते यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharing

Visitor Counter