शेतीत रक्षाविसर्जन करुन दिला प्रबोधनाचा संदेश

Beed

शेतीत रक्षाविसर्जन करुन दिला प्रबोधनाचा संदेश 

औरंगाबाद/संजय काळे 

आजकाल आपण पहातो बघाव तिकडं प्रर्दुषण झालेले पहावयास मिळते .प्रर्दूषणाचा कुणी विचार करताना दिसत नाही. परंतु पुण्यनगरीचे समूह सल्लागार असलेल्या शशिकांत बोर्हाडे यांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक करत आईच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जन नदीच्या पात्रात न करता शेतात खड्डे खंदून त्या खड्ड्यामध्ये केले . इतकेच नव्हेतर त्यावर झाडे लावून नवा प्रबोधनाचा अवलंबला आहे.
कालपरवा मंगळवार २ जून रोजी शशिकांत बोर्हाडे यांच्या मातोश्री गं.भा.विमल हरिचंद्र बोर्हाडे यांचे औरंगाबाद येथील बजाजनगर येथे  असलेल्या निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. यानंतर ३ जून रोजी रक्षाविसर्जन (राख सावडण्याचा )कार्यक्रमाचे आयोजन केले होते .बहुतांशी अशावेळी राखेचे विसर्जन नदीच्या पात्रात केले जाते.परंतु शशिकांत बोर्हाडे यांनी अशा जुन्या रुढीपरंपराना फाटा देत  राखेचे विसर्जन नदीत न करता शेतात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. नदीचे प्रर्दूषण थांबले पाहिजे हा विचार मनात घेऊन घेतलेला निर्णय कुटुंबातील सर्वानाच योग्य वाटला.
यानंतर ४जून रोजी त्यांनी आपल्या इमामपूर (ता.गंगापूर )येथील शेतीतील बांधावर खड्डे घेऊन या खड्ड्यामध्ये राखेचे विसर्जन  केले .याचबरोबर आपल्या  आईच्या स्मृती कायम रहाव्यात म्हणून या खड्ड्यामध्ये नारळ ,आंबा,लिंब आणि चिंचेची झाडे लावली. यावेळी  उद्योजक हनुमान भोंडवे, आय.जी.जाधव ,संजय भोरे यांची उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे हे करत असताना त्यांनी आपला चिरंजीव प्रीतम बोर्हाडे याला देखील सोबत ठेवून नव्या प्रबोधनात्मक पावलांचा साक्षीदार बनवले.

Sharing

Visitor Counter