आग लागलेल्या घाडगे कुटुंबाला मुस्लीम समाजाच्या वतीने मदत, मदत लागेपर्यंत मदत करू-खुर्शीद आलम

Beed

आग लागलेल्या घाडगे कुटुंबाला मुस्लीम समाजाच्या वतीने मदत ,मदत लागेपर्यंत मदत करू - खुर्शीद आलम

बीड(प्रतिनिधी) 

दि.29/5/2020रोजीच्या मध्येरात्रीच बार्शीनाका येथील कडव्या च्या गंजीला भयंकर आग लागली या आगीत अंदाजे आठ लाखांचे नुकसान झाले आहे या अग्नी तांडवात बाजुच्या परमेश्वर घाडगे या गरिब अॅटो रिक्षा चालकाचे घर शंभर टक्के जळून खाक झाले असून या कुटुंबातील व्यक्तीला खायला अन्नधान्य व अंगावर घालायला कपडे पायाला चप्पल सुद्धा राहिले नाहीत अशी माहिती न प.चे माजी सभापती खुर्शीद आलम यांना कडताच त्यांनी मुस्लीम समाजाच्या वतीने घाडगे या गरीब कुटुंबाला अन्नधान्य सह पाणी मटके व सर्व सदस्यांना कपडे आणि चप्पलचे जोड व भांडी बरतने दिले.

देशातील महाराष्ट्र हे कोरोना या महामारीचे केंद्र बिंदु ठरले आहे उष्णतेनचाही पारा चढला आहे लाॅकडाऊन मुळे अधिकच बेरोजगारी वाढली आहे असे असतानाच बार्शीनाका परीसरातील राहुल नगर शिंगण वस्तीतील जनावरांसाठी ठेवलेल्या कडव्याचे गंजीला मध्ये रात्री अचानक लागुन अंदाजे आठ लाख रुपयेचा नुकसान झाले आहे या भयंकर अग्नीताडंवात ज्ञानेश्वर परमेश्वर घाडगे या गरिब आटोरिक्षा चालकाचे घर जळून खाक झाले आहे घरात काहीही शिल्लक राहिलेले नाही पुर्ण कुटुंब उघडय़ावर पडले आहेत खायला अन्न नाही अंगावर घालयला दुसरे कपडे नाहीत पायात घालायला चप्पल नाही प्यायला पाणी भरण्यासाठी मटके भांडण बरतने नाही अतिशय गंभीर परिस्थिती आहे अशी माहिती या परिसरातील नागरिकां च्या वतीने खुर्शीद आलम यांना मिळताच त्यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने त्या गरीब कुटुंबाला अन्नधान्य सह,कपडे,पाणीचे मटके, भांडे बरतने व प्रत्येकी व्यक्तीला चप्पल चे जोड असे वस्तू मुस्लीम समाजाच्या वतीने खुर्शीद आलम यांनी दिली आहेत या वेळी खुर्शीद आलम सह मिसर भाई, उलायत खान,मोहसीन कुरेशी, मोमीन शारेख,फेरोज मनियार,व ज्ञानेश्वर घाडगे परिवार सह आदी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter