कृषि पुरस्कारांसाठी दि. 30 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कृषि पुरस्कारांसाठी दि. 30 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
शेती व पूरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयास दि. 30 जून 2022 पर्यंत सादर करावेत. तसेच सविस्तर माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी कळविले आहे.
राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठा शेतकरी पुरस्कार तसेच कृषि विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
