पत्रकार अशोक काळकुटे धमकी प्रकरणाची चौकशी अखेर IPS कुमावत यांच्याकडे ; पोलीस अधिक्षक ठाकूर यांचे आदेश

पत्रकार अशोक काळकुटे धमकी प्रकरणाची चौकशी अखेर IPS कुमावत यांच्याकडे ; पोलीस अधिक्षक ठाकूर यांचे आदेश
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील जगदंबा कला केंद्रात बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची तक्रार दाखल एका महिलेने दाखल केल्यानंतर. पत्रकार अशोक काळकुटे हे बातमी संकलनासाठी नेकनुर पोलिस स्टेशन मध्ये दि.१३ जुन २०२२ रोजी सायं.१० च्या दरम्यान गेले असता संबंधित प्रकरणातील आरोपी भाभी शमीम बानो शहाबोद्दीन शेख हिने पोलीस स्टेशन परिसरातच बातमी न टाकण्याची धमकी दिली. तसेच पोलिस स्टेशन च्या बाहेर जाताच बंकटस्वामी कमानीत अडवुन अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी सागर शहाबोद्दीन शेख व शेख समीर शेख अनिस यांनी दिली. याची माहिती नेकनुर पोलिस स्टेशन ला दिल्यानंतरही प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. यामध्ये दुसऱ्या दिवशी अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु आरोपी आणि पोलीस स्टेशन चे अधिकारी यांचे संबंध असल्याने आरोपींना पोलिसांचे मोठे सहकार्य मिळत आहे. यामुळे दि.१७ रोजी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची काही पत्रकारांनी भेट घेऊन सविस्तर प्रकरण सांगितले यानंतर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणाची चौकशी केज पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत (IPS) यांच्याकडे दिली आहे.
कला केंद्रात बळजबरीने केला जात होता वेश्या व्यवसाय.
बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील जगदंबा कला केंद्रात बळजबरीने एका महिलेकडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याची तक्रार पोलिस अधिक्षक बीड यांना देण्यात आली होती.
त्यानंतर संबंधित पोलिस स्टेशन नेकनुर येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याच प्रकरणातील आरोपी देखील पोलिस स्टेशनमध्ये आणले होते. या नंतर ही बातमी घेण्यासाठी पत्रकार ठाण्यात गेल्यानंतर त्यांना अशाप्रकारे धमक्या देण्यात आल्या आहेत.
असा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून पोलिस स्टेशन परिसरात जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतरही पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने पोलिस प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
