बीडमध्ये संस्कार भारतीकडून पद्मश्री योगेंद्रजी यांना श्रध्दांजली 

Beed

बीडमध्ये संस्कार भारतीकडून पद्मश्री योगेंद्रजी यांना श्रध्दांजली 

योगेंद्रजींचे गुण आपण आत्मसात करू शकलो तरच खरी श्रध्दांजली

संस्कार भारती देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भरत लोळगे यांचा भावना

बीड/वार्ताहर 

 संयम,संघटन आणि स्मरण हे योगेन्द्रजींच े गुण आपण आत्मसात करू शकलो तर खरी योगेंद्रजींना श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन संस्कार भारती देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भरत लोळगे यांनी केले. बीड येथे गुरूवारी संस्कार भारतीचे संस्थापक सदस्य पद्मश्री योगेंद्रजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी भरत लोळगे बोलत होते.

       गुरूवार १६ जून २०२२ रोजी संस्कार भारती बीडच्या वतीने संस्कार भारतीचे दिवंगत संस्थापक सदस्य पद्मश्री बाबा योगेंद्रजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद वझे यांनी प्रयागराज मध्ये संपन्न झालेल्या गंगामनुहर कार्यक्रमातील योगेंद्रजींच्या आठवणींना उजाळा दिला . संस्कार भारती बीड शाखेचा शुभारंभ योगेंद्रजी यांच्या हस्ते झाल्याचे सांगून श्रध्दांजली अर्पण केली. जगदीश पिंगळे यांनी योगेंद्रजींची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले व त्यांच्या बरोबर मुलाखतीत घडलेल्या काही प्रसंगाच्या आठवणी सांगीतल्या. जिल्हा उपाध्यक्ष सुरेश साळुंके यांनी बाबाजींवर कविता सादर केली.

 या वेळी जिल्हा समन्वयक गणेश तालखेडकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिनेश लिंबेकर कोषप्रमुख संतोष पारगावकर,मंत्री संघटन लक्ष्मीकांत सौदत्तीकर,मंत्री सुजित देशमुख,शहर सचिव अनिल कुलकर्णी,कोषप्रमुख महेश देशमुख यांच्या सह संस्कार भारती सदस्यांनी योगेंद्रजी यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून अभिवादन केले.

Sharing

Visitor Counter