केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
Beed

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
बीड/वार्ताहर
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.बुधवार, दि. 8 जून 2022 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथे आगमन. सकाळी 10.50 वाजता जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी सहाय्यभूत उपकरण वाटप ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह येथे नागरिकांशी संवाद. दुपारी 1.30 वाजता अंबाजोगाई विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत बैठक. दुपारी 3.30 वाजता अंबाजोगाई येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
