"त्या" गर्भपात प्रकरणातील महिला नर्स ची आत्महत्या

Beed

"त्या" गर्भपात प्रकरणातील महिला नर्स ची आत्महत्या

बीड/वार्ताहर 

शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध गर्भपात प्रकरणामुळे खळबळ उडवून दिला आहे त्यातच अता त्या प्रकरणातील आरोपी असलेली महिला नर्स ने आत्महत्या केल्याची माहीती ८जुन रोजी समोर आल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सीमा सुरेश डोंगरे वय ३६ रा.डी.पी रोड शिक्षक काॅलनी बीड असे मयत नर्स चे नाव आहे.तीन मुली नंतर अवैध गर्भपात करण्यात येत होता परंतु अति रक्तस्राव झाल्याने तीचा मृत्यु झाला होता असे समोर आले होते.यामुळे ७ जुन रोजी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातीलच आरोपी असलेली नर्स ने पालीच्या तलावात आत्महत्या केल्याची माहीती मिळाली असुन घटना सथळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे दाखल झाले आहे पुढील तपास करीत आहेत.

Sharing

Visitor Counter