ऐन संकटकाळी ईपका लेबोरेटोरीजच्या वतीने रक्तदान शिबीर

ऐन संकटकाळी ईपका लेबोरेटोरीजच्या वतीने रक्तदान शिबीर
वाळूजमहानगर/ प्रतिनिधी -
गत दोन महिन्यापासून देशात सुरू असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे . दिवसेंदिवस संसर्गजन्य आजारी होणाऱ्याची संख्या वाढत चाललेली आहे .अशा संकटकाळी वाळुज औद्योगिक परीसरातील ईपका लेबोरेटोरीज लिमिटेङच्या वतीने रक्तदान शिबीराचे(२६) रोजी आयोजन करून सामाजिक उत्तर दायित्व निभविले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त
संजय काळे, ईपका कंपनीचे मानव संसाधन व प्रशासकीय विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक व्यंकट मैलापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने कंपनीतील ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीर दत्ताजी भाले रक्तपेढीच्या ङाँ.मंजूषा कुलकर्णी ,ङाँ.निवृत्ती वानोळे, कृष्णा कुलकर्णी ,गजानन वाघ,राधा पठाङे,रेवती जोशी,संतोष भासाळ,तुषार खंङागळे, कल्पना शेळके,तुकाराम कांबळे यांनी रक्त संकलन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रफुल कांबळे,संदिप राजूरे,मनिषा गजभर,तेजस्वीनी श्रीवास्तव, राजू साळवे आदीनीं परीश्रम घेतले .
