धारूर घाटात सिमेंट घेवून जाणार ट्रक पलटी
Dharur

धारूर घाटात सिमेंट घेवून जाणार ट्रक पलटी
किल्ले धारूर (इरफान शेख)
आज सकाळी हैदराबादहून ६०० सिमेंट पोते घेवून बीड कडे जाणार ट्रक धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला सुदैवाने जीवित हानी टळली आहे ट्रक मध्ये चालक व किनर होते ट्रक पूर्णपणे चकाचुर झाला आहे चालक व किनर किरकोळ जखमी झाले आहेत
आज सकाळी धारूर घाटातून बीड कडे ६०० पोते सिमेंट घेवून जात असताना ब्रेक निकामी झाल्याने सकाळी चार वाजता समोरून येणाऱ्या स्करपियो गाडीला वाचवण्यासाठी चालकांने प्रसंगावधान दाखवत गाडी डोंगर चढावर चढवली यामुळे समोरून येणाऱ्या स्कर्पियो जीप मधील ६ प्रवाशी यांचे प्राण वाचले आहेत धारूर घाटात नेहमीच अपघात घडत आहेत येथील रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे
या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे
