7 पैकी 1 पॉझिटिव्ह तर सकाळी "मयत" झालेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह!

7 पैकी 1 पॉझिटिव्ह तर सकाळी "मयत" झालेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह!
बीड/प्रतिनिधी
काल रात्री एका १९ वर्षीय तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या एका तासात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती परंतु आज पाठवलेल्या ४२ अवाहाला पैकी एक पॉझिटिव्ह तर ४१ निगेटिव्ह आले आहेत आणि त्या मयतचा देखील अहवाल निगेटिव्ह आला आहे.
गेल्या पाच दिवसापासून बीड जिल्ह्यात आष्टी,पाटोदा,बीड गेवराई,वडवणी,माजलगाव,धारूर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर परवा तेरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती तर आज आष्टी तालुक्यातील १९ वर्षीय तरुणाला तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात आणलं होता त्या रुग्णाच्या स्वॅब घेण्यात आला मात्र अचानक सदरच्या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेने बीड जिल्ह्यातील खळबळ उडाली होती.
परंतु मयत झालेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला असून एक जण पॉझिटिव्ह आला अशी माहिती डाॅ. अशोक थोरात यांनी दिली.
पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती राहणार धनगर वाडी तालुका आष्टी हे रुग्ण मुंबईवरून आलेला आहे
