डॉ.राहुल टेकाडे कोव्हीड योद्धा पुरस्काराने सन्मानित
Beed

डॉ.राहुल टेकाडे कोव्हीड योद्धा पुरस्काराने सन्मानित
आष्टी/प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर आष्टी,जिल्हा बीडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांचा बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते कोव्हीड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपसंचालक डॉ.माले साहेब, बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे उपस्थित होते. मागील कोव्हीड काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.डॉ.राहुल टेकाडे म्हणाले, हे यश माझे एकट्याचे नसून,आष्टी ग्रामीण रुग्णालय तथा ट्रामा केअर सेंटरच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आहे.
