संत रविदास महाराज पंधराव्या शतकातील महान क्रांतिकारक अभिवादन -पप्पू कागदे यांचे प्रतिपादन

संत रविदास महाराज पंधराव्या शतकातील महान क्रांतिकारक अभिवादन -पप्पू कागदे यांचे प्रतिपादन
बीड / प्रतिनिधी
संत शिरोमणी रविदास महाराज पंधराव्या शतकातील महान क्रांतिकारक होते. त्यांनी तत्कालीन समाजाला समतेचा संदेश दिला. असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.
बीड शहरातील पेठ बीड सभागृह येथे बुधवार (ता.16) रोजी संत शिरोमणी
रविदास महाराज यांच्या ६५४ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात पप्पू कागदे बोलत होते. यावेळी जगदीश गुरखुदे, डॉ. लक्षमण जाधव, नगरसेवक बाळासाहेब गुजांळ, योगेश गायकवाड, विलास बामणे, सुभाष गायकवाड, किशोर गायकवाड, दत्ता परळकर,पुरुषोत्तम भोसले, अरुण कांबळे, परमेश्वर जाधव, रवींद्र माने,जीवन डोईफोडे, विष्णु गायकवाड, विजय चांदणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पप्पू कागदे म्हणाले की, संत रविदास महाराज यांनी जातीव्यवस्था नष्ट करून मानव समाजाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व मिळवून देण्यासाठी महान कार्य केले. तसेच अज्ञान, अंधश्रद्धा,विषमता यांच्यावर त्यांनी कडाडून प्रहार केला. संत शिरोमणी रविदास महाराज यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन होता. एकंदरीत पंधराव्या शतकात त्यांनी उचललेले पाऊल समाजाला दिशादर्शक होते. सतेच माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत, हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्यासाठी प्रेरित करणारे होते. त्यामुळे संत शिरोमणी महाराज यांच्या क्रांतिकारक विचारांची पाने युवा पिढीने वाचणे गरजेचे आहे.असे मनोगत पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पेठ बीड सभागृहात येथील नागरिकांनी मोलाचे परिश्रम घेतले.
