पुणे महाराष्ट्रातील युपीएससीचे विद्यार्थी विशेष ट्रेन पुण्यात दाखल

पुणे महाराष्ट्रातील युपीएससीचे विद्यार्थी विशेष ट्रेन पुण्यात दाखल
पुणे प्रतिनिधी/अमोल कदम
युपीएसससी विद्यार्थी दिल्ली रेल्वे स्टेशनवर विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन येथे आज पहाटे 3::10 वाजता पोहोचली . त्यामुळे एकूण 332 विद्यार्थी पोहोचले, त्यापैकी पुणे जिल्ह्यात 97 विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकी य पथकामार्फत करण्यात आली. कॉमेडी 19 संदर्भात संशयित आढळलेले नाही.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे तळहाताच्या मागील बाजू होम क्राईमचा शिक्का मारून त्यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये एसटी बस मार्फत पाठवण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले. तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या बहाने घरी गेले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले
