शेरी बु.येथे बोडखे गोरे यांचा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत आदर्श विवाह संपन्न

Ashti

शेरी बु.येथे बोडखे गोरे यांचा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत आदर्श विवाह संपन्न 

आष्टी/प्रतिनिधी,
बीड प्रसार न्युज.

कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील तरुण तरुणींनी या संकटाची सामना करताना सामाजिक अनिष्ट चालीरितींना मूठमाती देत लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आदर्श विवाहाचे उदाहरण घालून दिले आहे.
संचारबंदी आणि शारीरिक अंतराची दक्षता घेत आपल्या घरी केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीत  विवाह झाला आहे. या विवाहाचा अनेकांनी आदर्श घ्यावा असा विवाह  करून आनंदवाडीचे बोडखे आणि शेरी बु. गावचे गोरे परिवाराने उदाहरण घालून दिले आहे.
    आष्टी तालुक्यातील शेरी बु. येथील रहिवासी तथा आनंदराव धोंडे  महाविद्यालयातील राज्यशास्ञ विभागाचे प्रमुख प्रा.डाॕ.बाळासाहेब दशरथ गोरे यांचे चिरंजीव अजिंक्य याचा आनंदवाडी येथील रमेश जगन्नाथ बोडखे यांची कन्या अपेक्षा हिच्याशी आदर्श कोरोना विवाह झाला.वधु व वर यांचे मामा आईवडील या मोजक्या लोकांत सोशल डिस्टन्स पाळुन हा विवाह झाला.यावेळी सरपंच प्रा.डाॕ.राम बोडखे, प्रा.पप्पु गोरे, पञकार उत्तम बोडखे, सरपंच संदीप खाकाळ, सुनिल बोडखे हे उपस्थित होते.गोरज मुहूर्त,बँड,डीजे, मंगल कार्यालय ,सहस्त्रभोजन,सत्कार समारंभ ठरवलेले असताना वधूवर,वधूपिते,वरपिते यांनी हा सर्व थाटमाट रद्द केला आणि सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून नियोजित विवाहतिथी प्रमाणे दि.१८ मे २०२० रोजी दु.११:३६ वाजता मुलीच्या घराऐवजी नवरदेवा मुलाच्या घरासमोर अंगणात शेरी येथे विवाह झाला.घराच्या चार भिंतीच्या आत धार्मिक वेदशास्रोक्त विधी पार पाडला.विवाहस्थळी चुनाफक्कीने कोणी कुठे उभे राहायचे हे निश्चित करण्यासाठी वर्तुळे टाकली होती.वधू-वर,पुरोहित,मुलामुलींचे आईवडील,आणि मुला-मुलींचे मामा यांनीही मास्क वापरला.प्रत्येक हालचालीनंतर त्यांनी सॅनिटायजरचा वापर केला.आजच्या घडीतील कोराना आदर्श विवाह ठरावेत अशी चर्चा पंचक्रोशीत होत आहे.समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या विवाहाचा आदर्श घ्यावा असे आवाहन वरपिता प्रा.डाॕ.बाळासाहेब गोरे यांनी केले.सराटेवडगांव - आनंदवाडी येथील सरपंच प्रा.डाॕ.राम बोडखे यांनी पुढाकार घेवुन परवा मिसाळ परिवाराचा आणि आज बोडखे परिवाराचा असे दोन आदर्श कोराना विवाह घडवून आणले.

Sharing

Visitor Counter