बीड जिल्ह्यातील कोरोना चा पहिला बळी !
Beed

बीड जिल्ह्यातील कोरोना चा पहिला बळी !
बीड/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.मुळची पिंपळगाव ( ता.जि.नगर) येथील ती रहिवासी असून मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
