औरंगाबादेत नव्या 74 रुग्णांची भर, 823 वर 21 जणांचा मृत्यू

औरंगाबादेत नव्या 74 रुग्णांची भर, 823 वर 21 जणांचा मृत्यू
औरंगाबाद/सिद्धांत कांबळे
दि. 15 मे . शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा नव्या 74 रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता शहरातील कोरोनाग्रस्तांनी आठशेचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 823 वर गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. परजिल्ह्यातील 229 रुग्णांनी कोरोना मात केली आहे.
एन सहा ,सिडको (२), बुढी लेन (१), रोशन गेट (१), संजय नगर (१), सदात नगर (१), भीम नगर भाऊसिंगपुरा (२), वसुंधरा कॉलनी (१), वृंदावन कॉलनी (३), न्याय नगर (७), कैलास नगर (१), पुंडलिक नगर (८), सिल्क मील कॉलनी (६), हिमायत नगर (५), चाऊस कॉलनी (१), भवानीनगर (४), हुसेन कॉलनी (१५), प्रकाश नगर (१), शिव कॉलनी गल्ली नं.५ पुंडलिक नगर (१), होसेल कॉलनी गल्ली नं.५ (२), रहेमानिया कॉलनी (२), बायजीपुरा (५), हनुमान नगर (१), हुसेन नगर (१), अमर सोसायटी (१), न्यू हनुमान नगर गल्ली नं.१, दुर्गा माता मंदिर (१).
