लॉकडाऊन,कडकउन्हाळा आणि विजेचा लपंडाव -ऍड फिरोज खालीक

Beed

लॉकडाऊन,कडकउन्हाळा आणि विजेचा लपंडाव -ऍड फिरोज खालीक 

बीड/प्रतिनिधी 

सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन असून मे महिन्याचा कडक उन्हाळा सुरू असून संपूर्ण देशातील लोक कोरोना महामारीच्या महाभयानक वास्तवातून जात आहे.संपूर्ण देशातील जनता ही शासनाचे व प्रशासनाचे आदेशाचे काटेकोर पणे पालन करत असून सद्या घरा बाहेर कोणी निघत नाही, परंतु मागील काही दिवसापासून बीड शहरातील जनता विजेच्या लपंडावा मुळे खूप त्रस्त आहे सध्या कडक उन्हाळा असून बीड शहरातील वीज दुपारी व संध्याकाळी अचानक गायब होत आहे त्यामुळे लॉकडाऊन मुळे घरा मध्ये बसलेल्या पुरुष,महिला व लहान लहान मुलांना गर्मीचा खूप त्रास होत आहे,सद्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) पकडतात व अश्या भयानक गर्मी मध्ये वीज नसताना घरा मध्ये बसने अवघड होऊन जात आहे.परंतु बीड येथील जनता ही लॉक डाऊन चे काटेकोर पणे पालन करत असल्या मुळे घरा बाहेर पडत नाही शासनाचे व प्रसाशना चे आदेशाचे पालन करत आहे परंतु वीज वितरण कंपनीला याचे काही ही देने घेणे नाही सतत च्या व रोज रोज विजेच्या लपंडाव मुळे बीड शहरातील जनता खूप त्रस्त झालेली आहे त्यामुळे माननीय जिल्हा अधिकारी साहेब बीड यांनी स्वतः वीज वितरण अधिकारी यांना सूचित करून होणाऱ्या विजेच्या लपंडाव थांबवण्याचे आदेश करावे ही बीडच्या जनतेची विनंती आहे .

Sharing

Visitor Counter