मोमीन हफ़िज़ा मुहम्मद नवाज हिचा आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण

Beed

मोमीन हफ़िज़ा मुहम्मद नवाज हिचा आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण

बीड/प्रतिनिधी

मोमीन हफ़िज़ा मुहम्मद नवाज हिने आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. सध्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत तसेच उन्हाळा ही तप्त आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. यामुळे तरुण आणि वयस्क रोजेदार सुद्धा उन्हाने घायाळ होत आहे. अशा अवस्थेमध्ये सात वर्षीय हफ़िज़ा ने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला. याबद्दल तिचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तिचे आई-वडील, मामा-मामी, काका-काकु आत्या-मामा, बहीण-भाऊ आणि मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी हफ़िज़ा ला भरभरून शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले की, तिने यापुढेही आयुष्यभर असेच रमज़ान महिन्याच्या रोजाचे पालन करावे.

Sharing

Visitor Counter