धडाकेबाज कार्यवाही सुरु करत प्रताप नवघरे यांनी गुन्हेगारीला लावला लगाम

Beed

धडाकेबाज कार्यवाही सुरु करत  प्रताप नवघरे यांनी  गुन्हेगारीला लावला लगाम  

गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी  प्रताप नवघरे साहेब यांची सिंघम स्टाईल कार्यवाही  

गेवराई/प्रतिनिधी 

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत खुप मोठे बाजार पेठेचे गावे आहेत या तलवाडा पोलीस स्टेशन  ठिकाणी साहय्यक पोलीस निरीक्षक सुरेश  उनवने साहेब याची बडती झाल्यानंतर नुकतेच तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक पदी प्रताप नवघरे यानी पदभार स्विकारुन पंधरा दिवस झाले  असुन या भागात साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापजी नवघरे साहेब यांनी विविध ठिकाणी छापे टाकुन अवैध दारु जुगार बंद करण्यास सुरुवात केली आहे जुगार दारु पत्ते अशा अवैध धंद्याविरोधी कार्यवाही करुन गुन्हेगारीला लगाम लावत काम सुरु केल्याने या भागात अवैध कृत्य व अवैध जुगार करणार्या माफीयाना  पोलीस निरीक्षक प्रतापजी नवघरे साहेब याच्या नावाची धास्तीच झाली आहे गोळेगाव ता गेवराई येथे नुकतेच प्रेम प्रकरणातुन गोसावी समाजाच्या युवकाचा खुण झाला होता आवघ्या चोवीस तासात तपास करत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत जेरबंद केल्याने या सिंघम अधिकार्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे सध्या कोरोणा प्रस्थिती आहे तसेच लाॅकङाऊन आणी चेक पोस्ट वर तलवाङा पोलीस विविध ठिकाणी प्रवाशांचा गाड्या चेक करुन विनाकरण रसत्यावर फिरणार्या व्यक्तीवर धडक कार्यवाही करत आसल्याने विनाकरण गर्दी करणारे व रस्त्यावर फिरणार्या नागरीकात दहशत निर्माण झाल्याने तलवाङा पोलीस स्टेशनच्या कामगिरी बद्दल नागरीक समाधान व्यक्त करत आहेत अशाच पद्धतीने तलवाङा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीला आळा बसुन नागरीक शांततामय जिवन जगावेत अशी अशा सध्या नागरीक चर्चेतुन करत आहेत

Sharing

Visitor Counter