"दस का दम" च्या नावाखाली चक्री जुगारचा सुळसुळाट !

Beed

"दस का दम" च्या नावाखाली चक्री जुगारचा सुळसुळाट !

कोणाच्या आशीर्वादाने चक्री जुगाराला परवानगी ?

एस. पी. साहेब शहरात चालणाऱ्या चक्री जुगारावर कारवाई होईल का?

बीड प्रतिनिधी

शहर हद्दीत चालणाऱ्या "दस का दम"च्या नावाखाली चक्री जुगार चालत असल्याचं समोर येत असून चक्री जुगाराचा सुळसुळाट दिसत आहे नेमकं शहर हद्दीत कोणाच्या आशीर्वादाने चक्री जुगार सुरू आहे? चक्री जुगार चालवण्यासाठी कोणी परवानगी दिली? असा प्रश्न उपस्थित होत असून शहरात चालणाऱ्या चक्री जुगारावर पोलीस अधीक्षक कारवाई करतील का?असा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

शहरातील विविध भागात दस का दम नावाने चक्री जुगार सुरू आहे. या चक्रीमुळे व्यापारी नोकरदार व बेरोजगार तरुण कर्जाच्या डोंगराखाली सापडत आहे. खुल्या कंपनीत चालणाऱ्या या जुगाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. एस पी साहेब या चक्री चालवणाऱ्यांना कोणाचे वरदहस्त आहे. कोणाच्या दवाबा पोटी पोलीस यंत्रणा यांच्यावर कारवाई करत नाही याचा तपास जरा लावा. बस स्थानक समोर खड्ड्यात तीन, भाजी मंडी येथील एका धार्मिक स्थळाच्या बाजूला, सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला, राजुरी वेस अशा भाजी मंडी परिसरातच तब्बल पाच ते सहा चक्री सुरू आहेत. यासह जिल्हाभरात चक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून या चक्री चालकाला कोणाचे आशीर्वाद आहे. असा प्रश्न उपस्थित होत असून आपणच आता याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter