लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

Beed

लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

पहिल्याच दिवशी लसीकरणात गोंधळ
महसूल व पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका

किल्ले धारूर/प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने, कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आज नगरेश्वर मंगल कार्यालयात मधील लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाली होती. शहरात लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला आहे. 

धारूर शहरात आज नगरेश्वर मंगल कार्यालयात 45 वर्षे वयावरील वृद्ध व्यक्ती तसेच 18 ते 44 वयातील व्यक्तींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे नगरेश्वर मंगल कार्यालयात लस घेण्यासाठी खूप मोठी गर्दी झाली. गर्दी आवरणामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरले यातून आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे कुठलेही नियोजन लसीकरणासाठी दिसून आले नाही दोन्ही वयोगटातील व्यक्तींना एकाच ठिकाणी लसीकरणासाठी बोलवल्यामुळे खूप मोठी गर्दी झाली होती लस घेण्यापेक्षा मरणाची भीती नागरिकांना या ठिकाणी वाटत आहे

शहरातील अनेक नागरिक आज लस घेण्यासाठी नगरेश्वर मंगल कार्यालय आले तेथे गर्दीच गर्दी झाली होती लस घेण्यासाठी आलेल्या लोकांना अनेक तास तिष्ठत उभे रहावे लागत आहे या गर्दीवर आवर घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत ताळमेळ नसल्याने, लसीकरण केंद्रावर सगळा सावळा गोंधळ झाला. हा गोंधळ वेळीच आवरता घेतला नाही तर लसीकरण केंद्र कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याचा धोका आहे.
धारुरच्या आरोग्य विभागाचा नेहमीच नियोजनाचा अभाव दिसून येतो धारूर मधील आरोग्य विभागाने कोरोनाचे भान ठेवून काम करायला हवे नसता धारुर शहरात घराघरात कोरोना पसरेल.

Sharing

Visitor Counter