किल्लेधारुर युथ क्लब च्या वतीने पोलीस प्रशासन डॉक्टर्स वीज कर्मचारी पत्रकार बंधु व सफाई कामगारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार

किल्लेधारुर युथ क्लब च्या वतीने पोलीस प्रशासन डॉक्टर्स वीज कर्मचारी पत्रकार बंधु व सफाई कामगारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार
किल्लेधारुर (प्रतिनिधी)
धारुर शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना किल्ले धारूर क्लब नेहमीच सामाजिक कार्य करण्यात पुढाकार घेत असते .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यापूर्वीही अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत यामध्ये मास्क वाटप, गोरगरीब व्यक्तींना किराणा वाटप, तसेच मजुरांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना भाडे माफी मिळावी तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर त्यांचे थकीत पगार करण्यात यावे यासाठी वेळोवेळी दिलेले निवेदन असो हे सर्व कोरोना पार्श्वभूमीवर त्यांनी वेळोवेळी सामाजिक कार्य केले आहे किल्ले धारूर युथ क्लब या संस्थेने सत्कार करताना अनेक व्यक्ती घरात बसून असताना काही व्यक्ती आजही आपापल्या क्षेत्रावर काम करत आहेत कोरोना शी लढत आहेत मग त्यामध्ये डॉक्टर्स, नगरपालिका सफाई कामगार, वीज वितरण कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि या सर्वांना प्रसिद्धी देण्यासाठी पत्रकार बंधु हे सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता वेळी आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक नागरिक कोरोना पासून कसे दूर राहील याची दक्षता घेतात व प्रसंगी त्यांना वेळेवर जेवायला मिळत नाही त्यांना वेळेवर झोपायला मिळत नाही त्यांचा आराम हराम झाला आहे अशा परिस्थितीतही अगदी मन लावून काम करत आहेत आणि त्यांच्या कार्याची कुठे ना कुठे दखल घेऊन त्यांचा ना फुलाची पाकळी देऊन सत्कार करावा या हेतूने किल्ले धारूर युथ क्लब चे सदस्य त्यांचा सत्कार करण्यासाठी आज पुढे आले त्यांनी अनेक डॉक्टरांचा सत्कार केला पाणीपुरवठा कामगारांचा, सफाई कामगारांचा सत्कार केला त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला त्याचबरोबर संपूर्ण व्यक्ती आज घरात असताना वीज किती महत्वाची आहे घरामध्ये आज टीव्ही मोबाईल , कुलर , फॅन यांची किती आवश्यकता आहे ती बघून वीज वितरण कर्मचाऱ्यांनी अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवला आहे .
पोलिस प्रशासन आणि पत्रकार बंधू अहोरात्र मेहनत घेत आहेत .
या सर्वाचा सत्कार किल्ले धारूर युथ क्लब च्या वतीने करण्यात आला .
सत्कार करण्यासाठी किल्लेधारुर युथ क्लब चे अनेक सदस्य उपस्थित होते यामध्ये सुरेश शिनगारे , सूर्यकांत जगताप, प्रा नितीन शुक्ला , गौतमराव शेंडगे,धनुभाऊ भावठणकर रवि गायसमुद्रे , अनिल तिवारी , अशोक लोकरे ,दत्ता गोरे , नाथा ढगे हे उपस्थित होते
