धारूर शहरात गांराचा पाऊस फळबागांचे मोठे नुकसान

Beed

धारूर शहरात गांराचा पाऊस फळबागांचे मोठे नुकसान

किल्ले धारूर/प्रतिनिधी 

धारूर परिसरात दुपारी एकच्या दरम्यान  गारांचा पाऊस झाला. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही भागात गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला.

सध्या भर उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आंब्यासहित फळभाज्यांचे तर उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाला. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद,आंबा,पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.जोरदार पावसा सहवादळ वारे व गारांचा पाऊस झाला, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांत दहशत निर्माण झाली. अचानक हवामानात बदल झाल्याने मेघ गर्जने सह गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

Sharing

Visitor Counter