कोरोना फायटर-महिला पत्रकार- रुपाली जाधव

कोरोना फायटर-महिला पत्रकार- रुपाली जाधव
बीड/प्रतिनिधी
covid-19 शी मुकाबला करणाऱ्या अनेक डॉक्टर्स आणि पोलिसांना कोरोना फायटर, कोरोना योद्धा, ब्रेवो व देवदूत असे संबोधले जात आहे, कोरोना बाबत जनजागृतीची भूमिका बजावणाऱ्या व वास्तव मांडणी करणाऱ्या पत्रकारांचा ही काही अंशी गौरव होत आहे, मात्र कराड शहरातील एका महिला पत्रकाराने या लढ्यात स्वतःला झोकून दिले आहे, एक महिला असूनही कोरोना बाबत अतिशय सजग असणाऱ्या व ग्राउंड लेव्हल ला जाऊन रिपोर्टिंग करणाऱ्या क्रांतीज्योती न्यूजच्या रुपाली जाधव यांची दखल निश्चितच घ्यावी लागेल.
कराड शहर व परिसरातील लोकांना एक सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार म्हणून परिचित असणाऱ्या रुपाली जाधव यांनी नेशन फर्स्ट ही भूमिका घेऊन फ्रॉम द फर्स्ट डेट ऑफ करोना सक्रिय भूमिका बजावली आहे. दररोज शेकडो महिलांना फोन करून कोरोना बाबत जनजागृती आणण्याचे काम त्या करत आहेत. रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागरण करून कुटुंबीयांना तसूभरही वेळ न देता कोरोना लढ्यात सर्वस्व झोकून कार्य करत आहेत.
त्यांच्याबाबत लिहिण्याचे निमित्त म्हणजे पाच सहा दिवसांपूर्वीच त्यांनी कराड उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या गलथान कारभारामुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढू शकतो याबाबत एक भीमशक्ती आघाडीचे आनंदराव लादे यांची न्यूज चित्रफीत केली होती परंतु शहरात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये व याचा प्रशासनास त्रास होऊ नये या उदात्त हेतूने त्यांनी ती प्रकाशित केली नाही मात्र आज त्यांनी तयार केलेल्या न्यूज ची सत्यता दिसून आली. आज त्या अक्षरशः ढसाढसा रडल्या.. " माझ्या कराडातत एवढ्या दिवस कोरोनाचा शिरकाव नव्हता मात्र आज झाला " यामुळे त्यांना अतीव दुःख झाले आहे.
कोरोना बाबत सर्वात जास्त अपडेट असतानाही कोणतीही बातमी घाईगडबडीत करायची नाही हा मूलमंत्र त्यांनी जपला आहे, शहरात भागा भागात फिरून त्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत, तथापि जे ध्यानीमनी नव्हते ते अघटित घडले, यामध्ये नक्कीच उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांनी आवश्यक असणारी काळजी घेणे गरजेचे होते मात्र त्यांचा गलथानपणा सर्वांनाच कारणीभूत ठरत आहे... आनंदराव लादे यांनीदेखील टाहो फोडून या बाबत जनजागृती करण्याचे काम केले होते मात्र त्यांचा आवाज सर्वत्र पोहोचला नाही
असो, रुपाली जाधव या क्रांतीज्योती न्यूज च्या माध्यमातून अविरतपणे समाजासाठी झटत असून कोरोना मुक्तीची लढाई लढत आहेत. आज त्या प्रचंड उद्विग्न आहेत परंतु त्यांच्या कामाची दखल घ्यावी याच उद्देशाने चार ओळी त्यांच्याबाबत.....!
