तीन दिवसात रॅपिड अँटीजन तपासणीमध्ये शहरातील ७०जण कोरोना बाधित- डाॅ.मोराळे यांची माहिती

तीन दिवसात रॅपिड अँटीजन तपासणीमध्ये शहरातील ७०जण कोरोना बाधित- डाॅ.मोराळे यांची माहिती
आष्टी।प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
गेल्या दि.१८,१९ व २० या तीन दिवसापासून शहरातील तीन केंद्रांवर अॅटीजन तपासण्या करण्यात आल्या असून,दि २० रोजी शेवटच्या दिवशी ९६३ जणांच्या टेस्ट करून २० जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गेल्या तीन दिवसात तिन्ही केंद्रांवर २ हजार १९५ जणांच्या तपासण्या करत ७० जण कोरोनाबाधित असल्याची माहिती ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.रामदास मोराळे यांनी दिली आहे.
आष्टी शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाळा,जिल्हा परिषद मुलांची शाळा व श्री गणेश विद्यालयात तपासण्या करण्यात आल्या होत्या.यापैकी दि.१८ रोजी ६२९ तपासण्या केल्या तर २०जण कोरोना बाधित,दि.१९ रोजी ६०३तपासण्या तर ३३ जण कोरोना बाधित व आज शेवटच्या दिवशी म्हणजे दि.२० रोजी ९६३ तपासण्या २०कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आलेल्या कोरोना बाधितांमध्ये मध्ये दारूगल्ली-२,
मारवड गल्ली-४,तवलवाडी-१,शिक्षक काॅलनी-२,
एमआयडीसी-२,विनायकनगर-२,वाघळूज-१,कडा-२,
मंगरुळ रोड-२,दत्त नगर-१,खासबाग-१ असे एकूण २० जण कोरोना बाधीत झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ.रामदास मोराळे यांनी दिली आहे.
