असोला गावात अक्षय भैय्या चोले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न

असोला गावात अक्षय भैय्या चोले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न
रक्तदान हेच,सर्वात श्रेष्ठ दान
किल्लेधारूर/प्रतिनिधी
नवक्रांती सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख शिवश्री नवनाथ चोले यांनी अक्षय भय्या चोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
असोला येथील ग्रामीण उप केंद्र या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेऊन सद्या ची स्थिती पाहता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश जी टोपे यांच्या माहिती नुसार राज्यात १५-२०दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे. ह्याच विचार लक्षात घेऊन रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी एकूण 46 रक्त दात्यांनी रक्त दान केले यावेळी उप केंद्राच्या नर्स संगीता बोबडे,एस.बी. नरवडे(ए.एन.एम.),आशा वर्कर.एस.एस.आघाव,व्ही.के. वाघमारे व आयोजक शिव व्याख्याते नवनाथ चोले.गावचे सरपंच डॉ.गणेश चोले,धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस,पत्रकार सतीश पोतदार,अतीक मोमीन,रवि गायसमुद्रे, इरफान शेख,तसेच गावातील नागरिक व मनसेचे विध्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रशांत शिनगारे,राजमुद्रा ग्रुपचे युवक तालुका अध्यक्ष नाथा चव्हाण,यशोदीप शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पूजदेकर तसेच भारत चोले,प्रकाश चोले, शिवाजी चोले, आदिनाथ चोले,गणेश कापसे, मुन्ना पठाण, गावर्धन कांबळे,इत्यादी उपस्थित होते.
