परळी शहरातील संपूर्ण संचारबंदी शिथील

Beed

परळी शहरातील संपूर्ण संचारबंदी  शिथील

शहरातील कोरोना बाधित रुग्ण असलेल्या १३ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

बीड/प्रतिनिधी 

संपूर्ण परळी शहरातील  लागू केललीे संचारबंदी  शिथील करण्यात आली आहे 
  शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा १३ भागांमध्ये यापुढे २० जुलै २०२० पासून फौजदारी प्रकिया दंड संहीता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार कंटेनमेंट झोन (Containment zone ) घोषित करण्यात येत आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत 

यापूर्वी परळी शहरामध्ये ४ ते २० जुलै  २०२० या कालावधीत संपूर्ण शहरामध्ये  फोजदारी प्रकिया दंड संहीता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार मनाई आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली होती. शहरातील इतर सर्व भागात दिनांक ४ जुलै 2020 पूर्वी असलेली परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे.

या कालावधीत परळी शहरातील विविध भागात कोरोना विषाणूची लागण (covid-19 Positive) झालेले रुग्ण आढळुन आले असल्याने तेथे कंटेनमेंट झोन ( Containment zone)  घोषित करण्यात आले आहेत

*परळी शहरातील कोरोना १३ कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे*

सर्वेश्वर नगर मधील प्रभाकर साठे यांचे घरापासून अनंतराव देशमुख यांच्या घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

विद्या नगर मधील शिवशंकर निर्मळ  यांच्या घरापासून  अमोल टी हाऊस पर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

मोंढा( गांधी मार्केट) मधील रामेश्वर ओझा यांच्या घरापासून  शिरीष सलगर यांच्या घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

  सिद्धार्थ नगर मधील वैजनाथ ठोसर  यांच्या घरापासून महादेव  ताटे यांच्या घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

आझाद नगर मधील शेख अलाउद्दीन यांचे घरापासून खिजरा पानमहाल पर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 इंद्रा नगर मधील श्री लोखंडे व श्री काकर यांचे घरापासून ते शब्बीर पठाण आणि श्री सूर्यवंशी यांचे घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

भिम नगर मधील किसन मस्के यांच्या घरापासून ते सुनील मस्के यांच्या घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 न्यू पेठ मोहल्ला मधील ऊर्जा जुने कार्यालय ते सुरेश्वर मंदिर पर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

पेठ मोहल्ला मधील शेख रफिक हमीद यांचे घर ते सय्यद रियासत अली यांच्या घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 गोपण पाळे गल्ली  मधील अरुण तारे यांच्या घरापासून कल्पेश पाथरकर यांच्या घरापर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 जुने रेल्वे स्टेशन  भागातील श्री. नाईकवाडे यांचे घरापासून रझाक हॉटेल पर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 गुरुकृपा नगर मधील सोपान पतंगे यांचे घर गायकवाड कुशन वर्क्स पर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 बरकत नगर मधील हुदा प्रा स्कूल पासून ते अबू बकर मज्जिद पर्यंत या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे

 याबाबत  जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी अहवाल सादर केला आहे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन परळी शहरात या १३ ठिकाणी प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात येवून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद येत आहे असे सूचित केले आहे .

Sharing

Visitor Counter