सरकारने ग्रामपंचायतवर प्रशासन नेमणे म्हणजे लोकशाहीचा खून करण्यासारखे आहे.- आ.सुरेश धस

सरकारने ग्रामपंचायतवर प्रशासन नेमणे म्हणजे लोकशाहीचा खून करण्यासारखे आहे.- आ.सुरेश धस
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
सरकारी पक्षाचा प्रशासक किंवा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी पालकमंञ्यांची संमती घेऊन त्या गावचा प्रशासक सरकारी अधिकारी न नेमता एखाखा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नियुक्त करायचा अशा प्रकारचा जो जी.आर.राज्य सरकारने काढलेला आहे.हा प्रकार म्हणजे सरकारने लोकशाहीचा खून करण्यासारखे असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.ते आष्टी येथे पञकारांशी संवाद साधताना
बोलत होते.
पुढे आ.धस म्हणाले की,जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय या सरकारने रद्द केल्याने आधीच ग्रामीण भागात या सरकारच्या निर्णयाबाबत प्रचंड खदखद आहे.त्यात भर म्हणून की काय,प्रशासक नेमण्याचे सर्वस्वी अधिकार पालकमंञ्यांना दिल्यानंतर यामध्ये गावोगावचे राजकीय वातावरण दुषित होण्यास सुरुवात होईल आणि वादविवाद या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासन नेमण्याच्या या निर्णयाच्या बाबतीत सरकारने फेरविचार करुन हा निर्णय रद्द करण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
