बीड बायपास वर फोर व्हीलर व दुचाकीचा भीषण अपघात;नवरा-बायको जागीच ठार

बीड बायपास वर फोर व्हीलर व दुचाकीचा भीषण अपघात;नवरा-बायको जागीच ठार
बीड प्रतिनिधी
बीड बायपास रोडवर आज (बुधवार) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या फोर व्हीलर कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील नवरा-बायको जागीच ठार झाल्याची घटना बीड बायपासवर घडली असून या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे बळीराम पांडू राठोड (वय ४०) व सुमनबाई बळीराम राठोड (वय ३८) अशी आहेत. दोघेही राजपिंपरी (ता. गेवराई, जि. बीड) येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम राठोड आणि त्यांची पत्नी सुमनबाई हे अंतर्वन पिंपरी तांडा येथे एका लग्नासाठी गेले होते. लग्नाची समारंभ आटोपून ते मोटारसायकलवरून परत येत असताना बीड बायपास रोडवर भरधाव वेगात असलेल्या एका फोर व्हीलर कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व संबंधित पोलिसांना कळवले. अपघाताची नोंद घेण्यात आली असून,मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बीड येथे पाठवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
