सुकन्या समृध्दी योजना खाते उघडणाऱ्यांसाठी डाक कार्यालयाचे 9 व 10 फेब्रुवारीला विशेष अभियान

सुकन्या समृध्दी योजना खाते उघडणाऱ्यांसाठी डाक कार्यालयाचे 9 व 10 फेब्रुवारीला विशेष अभियान
बीड/वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वानिमित्त बीड विभागातील सर्व डाक कार्यालयाअंतर्गत “सुकन्या समृध्दी योजना खाते” उघडण्यासाठी दि. 9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी 2023 या दिवशी विशेष अभियान आयोजित करण्यात आले असून पालकांमध्ये बचतीचे महत्व वाढावे. तसेच मुलींचे शिक्षण, भवितव्यासाठी ही योजना किती महत्वाची आहे याबाबत डाक कर्मचारी ग्रामपंचायत, अंगणवाडी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकामध्ये योजनेचे प्रबोधन करणार आहेत. तसेच आठवडी बाजार, मंदिर यात्रा, शाळामध्ये पालक मेळावा या माध्यमातून योजना जनसामान्यपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनेचा उद्देश पालकामध्ये बचतीसाठी जनजागृती व्हावी, असे अधिक्षक डाकघर बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
सदर योजनेत 250 रुपये भरुन खाते उघडता येते, खाते उघडल्यापासून पूढील 15 वर्षापर्यंत खात्यात दरमहा बचत करावी लागते, कमीत कमी 250 व जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार पर्यंत रक्कम वर्षात भरता येते. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर, बारावी उतीर्ण झाल्यावर किंवा मुलीचे लग्न जमल्यावर जमा रकमेतुन 50 टक्के रक्कम काढता येते. खात्यात कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम ( व्याजासहित) काढून ते खाते बंद करता येते, ही योजनेची वैशिष्टे आहेत.
आवश्यक कागदपत्रे योजनेचा डाक कार्यालयात विहित नमून्यतील अर्ज, मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र, मुलीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड,पॅन कार्ड, मुलीचे व पालकाचे 2 फोटो व रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे. योजनेची सर्व माहिती बीड विभागातील जवळच्या प्रत्येक डाक कार्यालयात उपलब्ध आहे. बीड जिल्हयातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे हे नागरिकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे. आर्थिक प्रगतीसाठी व आपल्या मुलीचे उज्वल भविष्यासाठी पोस्ट ऑफीसमधील सुकन्या समृध्दी योजना खात्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करुन लाभ घ्यावा.
