आंतरजिल्हयातून आलेल्या सर्व नागरिकांनी/विध्यार्थ्यांनी अंगणवाडी सेविका जाधव ताई यांच्याकडे नाव नोंदणी करावी.

Ashti

#आंतरजिल्हयातून आलेल्या सर्व नागरिकांनी/विध्यार्थ्यांनी अंगणवाडी सेविका जाधव ताई यांच्याकडे नाव नोंदणी करावी.

अष्टी /प्रतिनिधी

संसर्गजन्य कोरोना आजाराचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. मागील एक महिन्यात आपण जर एक दिवसाचा प्रवास अथवा मुंबई, पुणे व अहमदनगर किंवा इतर जिल्ह्यातून गावी गणगेवाडी ता आष्टी येथे आला असलात तर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

कोरोना आजाराचे लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःहुन अथवा जवळच्या नातेवाईक किंवा शेजाऱ्यांनी अंगणवाडी सेविका जाधव ताई यांच्याकडे नाव नोंदनी करावी. नाव नोंदणी करताना आपले नाव, संपर्क क्रमांक व कोणत्या जिल्ह्यातून आला आहात याची माहिती द्या.

अंगणवाडी सेविका जाधव ताई यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्या. घराबाहेर पडू नका. घाबरु नका. आपल्या या खबरदारीने कोरोना आजाराचा प्रसार आपल्या कुटुंबासोबतच आपल्या गावामध्ये थांबवू शकतो. सुचना पाळून प्रशासनास सहकार्य करावे.

Sharing

Visitor Counter